breaking-newsमहाराष्ट्र

औरंगाबाद दंगल प्रकरणी लच्छू पैलवानला अटक

औरंगाबाद : औरंगाबाद दंगल प्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक करण्यात आली आहे. दंगल भडकवणे, जाळपोळ करणे या आरोपांखाली लच्छू पैलवानला सिटी चौक पोलिसांनी अटक केली. लच्छू पैलवानचे  खरं नाव लक्ष्मीनारायण बखरिया आहे. परंतु तो लच्छू पैलवानाच्याच नावाने ओळखला जातो.

औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात ११ मे रोजी किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास २५ दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत ३० ते ४० जण जखमी झाले आहेत. तर यात दोघांचा मृत्यू झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button