breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी दणदणीत विजय

शारजाह – आयपीएलच्या 13व्या सीजनचा 16वा सामना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) दरम्यान शारजाहमध्ये रंगला. अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवला. आयपीएल 2020 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा तिसरा विजय होता. कालच्या सामन्यात दिल्लीने कोलकाताला 229 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते. मात्र कोलकाताला या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करता आला नाही. कोलकाताला 20 षटकांत 210 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीने या सामन्यात केकेआरवर सहजपणे विजय साकारला.

सामन्याच्या सुरुवातीला नाणेफक हरुनही फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांनी संघाला अर्धशतकी सलामी दिली. मात्र धवन 26 धावांवर बाद झाला. पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले पण नंतर तोही 66 धावांवर बाद झाला. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर ऋषभ पंतनेही तुफान फटकेबाजी करत अवघ्या 17 चेंडूत 38 धावा केल्या. त्यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र तुफान फटकेबाजी केली. त्याने फक्त 38 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २२८ धावा केल्या. रसेलने सर्वाधिक २ बळी टिपले.

अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 229 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. सुनील नारायण 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि नितीश राणा यांनी 64 धावांची भागीदारा रचली. नितीश राणाने फटकेबाजी करत 35 चेंडूत 58 धावा केल्या. त्यानंतर आंद्रे रसेल (13), दिनेश कार्तिक (6) आणि पॅट कमिन्स (5) झटपट बाद झाले. नितीश राणा बाद झाल्यावर दिल्ली सामना जिंकणार असे वाटत होते. मात्र इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटपर्यंत लढा दिला. 229 सारख्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना इयॉन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये 30 चेंडूत 78 धावांची भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. पण अखेर कोलकाता नाइट रायडर्सला 18 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यात इयॉन मॉर्गनने 18 चेंडूत 5 षटकारांसह 44 धावा केल्या, तर राहुल त्रिपाठीने 16 चेंडूत 36 धावा केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button