breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Maharashtra Kesari : यंदा धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा!

विजेत्या मल्लाला मिळणार स्कॉर्पिओ गाडी व मानाची गदा

मुंबई : महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा यंदा धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर होणार आहे. ही स्पर्धा येत्या १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत रंगणार आहे. विजेत्या मल्लासाठी स्कॉर्पिओ गाडी व मानाची गदा व अन्य विजेत्या मल्लांसाठी दोन कोटींची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

स्पर्धेसाठी २० गट सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील कुस्तीपटू, कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत ही भव्य स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी विजेत्या मल्लांना मोटारसायकली, चांदीची गदा, मानचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात येणार आहेत. स्थानिक कुस्तीपटूनाही महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून संधी दिली जाणार असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – शिक्षक दिन : संघर्षामध्ये जो टिकून राहिल तो समृद्ध होईल! 

धाराशिव शहरात सलग पाच रंगणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ४५ वेगवेगळे जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. ४५० खेळाडू माती व ४५० खेळाडू गादी गटात असे ९०० खेळाडू सहभागी होणार आहेत. माती व गादी अश्या वेगवेगळ्या वजन गटात स्पर्धा पार पडणार असल्याची घोषणा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने केली.

धाराशिव जिल्ह्याला पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळत आहे. साधारणपणे एक लाख प्रेक्षक बसतील अश्या स्वरूपाची असणार गॅलरी उभारण्यात येणार आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ व धाराशिव कुस्ती तालीम संघ त्याबाबत आयोजन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button