breaking-newsUncategorizedआंतरराष्टीय

मुस्लीम डॉक्टरकडून ४ हजार बौद्ध महिलांची नसबंदी

एका मुस्लीम डॉक्टरने ४ हजार बौद्ध सिंहला बौद्ध महिलांची नसबंदी केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. श्रीलंकेतल्या डिव्हाईन या आघाडीच्या वृत्तपत्राने या संदर्भातली बातमी पहिल्या पानावर दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आणखी भयंकर बाब ही की या प्रकरणातला डॉक्टर हा कोलंबो या ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटासाठी जबाबदार असलेल्या नॅशनल तौहीद जमात या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे अशीही माहिती समोर आली आहे. रॉयटर्सनेही यासंदर्भातले वृत्त दिले आहे. २३ मे रोजी डिव्हाईन या वृत्तपत्राने पहिल्या पानावर या प्रकारासंदर्भातले वृत्त प्रकाशित केले होते.

डॉ. सेगू शहाबुद्दीन मोहम्मद शफी असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. इस्टर संडेच्या दिवशी कोलंबोत जे साखळी बॉम्बस्फोट झाले ते घडवणाऱ्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेल्या डॉक्टरने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.श्रीलंकेतल्या साखळी स्फोटात ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.  दरम्यान ही बातमी आम्ही पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवर, रूग्णालयांमधल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिली आहे. आम्ही त्यांची ओळख समोर आणू इच्छित नाही असे डिव्हाईन या वृत्तपत्राचे संपादक अनुरा सोलोमन्स यांनी रॉयटर्सला सांगितले आहे.

डॉक्टर सेगू शहाबुद्दीन शफी या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याला पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात अटक झाली आहे. नसबंदी प्रकरणाबाबत माहिती देण्यास या डॉक्टरने नकार दिल्याचे पोलिसांनी रॉयटर्सला सांगितले आहे. या डॉक्टरने कुरुनेगला या ठिकाणी असलेल्या रूग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांवर त्यांची संमती न घेत गुपचूप नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान हे वृत्त समोर आल्याने श्रीलंकेत चांगलाच तणाव निर्माण झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button