breaking-newsमनोरंजनमुंबई

बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेता करण ओबेरॉयला जामीन मंजूर

बलात्कारप्रकरणी गेल्या महिनाभरापासून तुरुंगात असलेला अभिनेता आणि गायक करण ओबेरॉयला अखेर मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी दिलासा दिला. हायकोर्टाने करण ओबेरॉयला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तपास अधिकारी बोलावतील त्यावेळी चौकशीसाठी हजर रहावे, असेही हायकोर्टाने करण ओबेरॉयला सांगितले आहे.

करण ओबेरॉयचे २०१६ पासून एका ज्योतिष महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. लग्नाचे आश्वासन देऊन करणने बलात्कार केल्याचे महिलेचा दावा आहे. संबंधित महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०१६ मध्ये त्यांची डेटिंग अॅपद्वारे ओळख झाली होती. हळूहळू या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. करणने एकदा भेटण्यासाठी घरी बोलावले होते. यानंतर करणने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. करणने बलात्काराचा व्हिडिओ तयार करुन ब्लॅकमेल केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर ६ मे रोजी ओशिवरा पोलिसांनी करण ओबेरॉयला अटक केली होती. तेव्हापासून करण ओबेरॉय तुरुंगात होता. करणच्या वतीने मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी या अर्जावर सुनावणी झाली असता हायकोर्टाने करणला जामीन मंजूर केला.

दरम्यान, करण ओबेरॉयविरोधात गुन्हा दाखल होताच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला होता. करण आणि त्या महिलेचे प्रेमसंबंध होते आणि दोघांनीही एकमेकांच्या सहमतीने शरीररसंबंध ठेवले होते. महिलेने कायद्याचा गैरवपार करत ही तक्रार दाखल केली, असा दावा करणच्या मित्रांनी पत्रकार परिषदेत केला होता.

याप्रकरणात करणविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेने हल्ला झाल्याची तक्रारही पोलिसांकडे दिली होती. माझ्यावर अज्ञातांनी हल्ला केला असून त्यांनी करणविरोधातील तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याचे तिने म्हटले होते. मात्र, पोलीस तपासात या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे उघड झाले होते. महिलेच्या वकिलानेच हल्ल्याचा बनाव रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button