breaking-newsमहाराष्ट्र

मुलीवर अतिप्रसंग करून खून; आरोपीस जन्मठेप

अलिबाग – मुलीवर अतिप्रसंग करून तिला जीवे मारणारा आरोपी दिलीप संजय नाईक याला  विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेप व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या गुन्ह्यातील पिडीत मुलगी ही आदिवासी वाडीवर पाचवीचे कार्यक्रमास गेली होती तो कार्यक्रम आटपून घरी परत येत असताना यातील आरोपी दिलीप संजय नाईक (२२) रा. श्रीगाव आदिवासीवाडी याने सदर पिडीत मुलीस रात्रीच्या वेळी रस्त्यात गाठून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अतिप्रसंग करून तीला कोणत्यातरी धारदार हत्याराने जखमी करून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चेहऱ्यावर वार केले होते. या गुन्ह्याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाची गंभीरता पाहून तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्य़ााचे तपासिक अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक आर. एन. राजे  यांना मार्गदर्शन करून लागलीच सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यास अटक करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे तपासिक अंमलदार आर.एन.राजे  व पोयनाड पोलीस पथकांनी गोपनीय माहिती मिळवुन गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या तासातच आरोपीस जेरबंद केले होते.

या गुन्ह्य़ात सबळ साक्ष पुरावा प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.

या गुन्ह्यातील पिडीताला न्याय मिळवुन देण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार  पोयनाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एल. शेवाळे , सरकारी वकील नीला तुळपुळे, सहायक फौजदार गावंड, परवी अधिकारी नाईक यांनी गुन्ह्यातील साक्षीदार यांना वेळोवेळी कोर्टात हजर ठेऊन व साक्षीदार यांनीही पिडीतेला न्याय मिळून देण्याच्या दृष्टीने कोर्टात चांगल्या प्रकारे साक्ष दिल्याने  विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश रायगड यांनी गुन्ह्य़ातील आरोपी दिलीप  नाईक यास जन्मठेप व हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button