breaking-newsपुणे

फेसबुकवरील मैत्रीतून ४७ लाखांचा गंडा

फेसबुकवर एका महिलेने मैत्रीची विनंती पाठविल्यानंतर झालेल्या ओळखीतून स्वारगेट भागातील एका व्यावसायिकाला ४७ लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका ५९ वर्षीय व्यावसायिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  फिर्यादीनुसार अ‍ॅलंथिया स्मिथ नावाच्या महिलेसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तक्रारदार व्यक्ती शंकरशेठ रस्ता परिसरात राहायला आहे. त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. फेसबुकवर काही महिन्यांपूर्वी तक्रारदाराला अ‍ॅलंथिया स्मिथ नावाच्या महिलेने मैत्रीची विनंती पाठविली होती. अमेरिकेत वास्तव्य असून तेथे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची बतावणी तिने तक्रारदाराकडे केली होती. तिने जमीन खरेदी विक्री व्यवहारात गुंतवणूक करायला तक्रारदाराला  सांगितले. भारतात लवकरच येणार असल्याचे तिने सांगितले. गेल्या महिन्यात तिने तक्रारादाराच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी माझ्याकडील सोने जप्त केले आहे. ते सोडविण्यासाठी तातडीने काही रक्कम जमा करावी लागेल, असे तिने सांगितले. त्यानंतर लगेचच एकाने तक्रारदाराशी संपर्क साधला आणि सीमा शुल्क विभागातील अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली.  तक्रारदाराला बँकखात्यात पैसे भरण्याची सूचना करण्यात आली. त्याने वेळोवेळी ४७ लाख ७ हजार रूपये बँकखात्यात जमा केले. दरम्यान, अ‍ॅलंथिया स्मिथशी तक्रारदाराने संपर्क साधला. तेव्हा तिचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे निदर्शनास आले. तक्रारदाराने ज्या क्रमांकावर संपर्क साधले होते, ते मोबाईल क्रमांक बंद होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button