breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इच्छाशक्ती असेल तर अडचणींंवर मात करुन धेय्यपूर्ती गाठता येते – राहूल जाधव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – विद्यार्थ्यांना बालपनातच योग्य मार्गदर्शन लाभले तर भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात, चांगला भविष्यकाळ तुमच्या शिक्षणातच दडला आहे. आई-वडिलांच्या आशा आकांक्षा पूर्ण कराव्यात. आपल्या यशामुळे आई-वडिलांना वेगळ्याच आनंदाची अनूभुती येते. यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणींंवर मात करुन धेय्यपूर्ती करता येते, असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शहरातील विद्यालयातून शालांत परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या सुनिता
तापकीर, शर्मिला बाबर, निर्मला कुटे, आरती चोंधे, आश्विनी चिंचवडे, आश्विनी जाधव, मिनल यादव, नगरसदस्य नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्य्क आयुक्त स्मिता झगडे, नागरवस्ती विकास योजना या विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, लोककल्याणाच्या योजनांचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी लाभ घ्यावा. करीयरमध्ये नावलौकीक केला पाहिजे, एखादा वैदयकीय क्षेत्रात मोठा डॉक्टर सर्जन होणे, ही वेगळी बाब आहे. परंतू, त्या सर्जनची ओळख व नावलौकिक ज्यावेळी जनमानसात होते. तोच खरा सर्जन म्हणून नावारुपाला येतो. आपले जवान सरहद्दीवर देशसेवा करण्यासाठी कायम सज्ज असतात. या जवानांचे देशवासीयांसाठीचे योगदान बहूमूल्य आहे. देशसेवा करण्यासाठी आपण प्रत्येकाने सरहददीवरच जावून लढले पाहिजे असे नाही. तर, सेवेच्या वेगवेगळया क्षेत्रांमध्ये जावून देशसेवा करता येईल. विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकरचे गुण संपादन केले, म्हणजे सर्व काही झाले असे नाही. तर, प्रत्येकाने माणूस म्हणून माणूसकी जोपासून जनमानसात काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथील हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. व्याख्याते प्रा. अरविंद नातू, प्रा. आनंद देसाई आणि सचिन वाघ यांनी करियर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. इयत्ता १० वी मधील विदयार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या १३४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी १ लाख रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले. इयत्ता १० वी मधील विदयार्थ्यांना ८० ते ९० टक्केपर्यंत गुण प्राप्त केलेल्या २६४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी ६४ लाख १० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले. इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या ९४२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले. याप्रमाणे एकूण ४९२३ लाभार्थी विद्यार्थ्यांना एकूण रक्कम रुपये ६ कोटी ६ लाख ४० हजार इतकी रक्कमेचे बक्षिस प्रोत्साहनपर डिजीटल पेमेंटव्दारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात
आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. तर, सुत्रसंचालन बी. के. काकडे यांनी केले. तर, आभार अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button