breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९’ हे स्वतंत्र बँक खाते, मदत करू इच्छिणा-यांनी या खात्यात जमा करावी रक्कम

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत असून, या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था सहभागी होत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत…, तसेच काहीजण मदत करू इच्छित आहेत. म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-१९ हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था या राज्य सरकारच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात, त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरू करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, सदर देणग्यांना आयकर अधिनियम १९६१ च्या ८० (जी) नुसार आयकर कपातीतून १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.

खात्याची सविस्तर माहिती

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button