breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सातबारा उतारा होणार बंद; भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

 

पुणे | प्रतिनिधी 
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्ही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा बंद करून त्याठिकाणी फक्त प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पुणे शहरासह राज्यातील अनेक शहरात जमिनींच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारी फसवणूक टळणार आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर हवेली तालुक्यामध्ये या प्रणालीचा वापर करून माहिती जमा केली जाणार आहे.

या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर राज्यभरात हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती राज्याचे जमावबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांनी दिली. महापालिकेच्या हद्दीत यापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडून सर्व मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे, मात्र त्या जागेचे सातबारा उतारे बंद करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उतार्‍यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button