breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाडेकरुंची माहिती लपविली ; चिंचवडमध्ये तीन घरमालकांना दंड

पिंपरी – घरमालकाने भाडेकरूंची माहिती दिली नाही. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी घरमालकांवर खटला भरला. न्यायालयाने त्या तीन घरमालकांना दंड ठोठवल्याची माहिती पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी दिली.

अनेकदा घरमालक भाडेकरू ठेवतात. भाडेकरूंची त्यांची माहिती पोलिसांना देणे कायद्याने बंधनकारक असूनही मालक ती देत नाहीत. अशा घरमालकांना शोधून त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मोहीम पुणे पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यानुसार भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या तिघांना न्यायालयाने दंड ठाठोवला आहे. अशीच मोहीम संपूर्ण शहरभर हाती घेतल्याची माहिती उपायुक्‍त शिंदे यांनी दिली.  यापूर्वी कासारवाडी भागात काही दहशतवाद्यांनी खोली भाड्याने घेऊन वास्तव्य केले होते. तसेच काही सराईत गुन्हेगार खोली भाड्याने घेऊन राहतात. गुन्हा केल्यानंतर ते खोली सोडून निघून जातात. अशावेळी आरोपीला शोधायचे कसे, असा प्रश्‍न पोलिसांसमोर निर्माण होतो. तसेच भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकावरही कारवाई होते. जर भाडेकरूचे शासकीय ओळखपत्र आणि कायमचा पत्ता पोलिसांकडे असल्यास गुन्हा घडल्यावर त्याला शोधणे पोलिसांना सोपे होते. तसेच आपली माहिती पोलिसांकडे आहे, याचा धाकही भाडेकरूला राहतो.

पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे म्हणाले, “”घरमालकाने रजिस्टर ऍग्रिमेंट केले की नाही, तसेच तो घराचा व्यावसायिक वापर करतो काय, याबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नसते. याबाबतची माहिती पोलिस अन्य कोणत्याही विभागास देत नाही. फक्‍त जर भाडेकरूने गुन्हा केल्यास त्याला शोधणे पोलिसांना सोपे होते. हाच यामागचा उद्देश आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button