breaking-newsआंतरराष्टीय

ग्लोबल वॉर्मिंगचा जहाज कंपन्यांना होतोय फायदा

  • आर्क्‍टिकवरील नॉर्दर्न सी रूट अधिक काळ वापरता येणार 

कोपनहेगन – ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे संपूर्ण जग चिंतेत असले तरी जहाज कंपन्यांना मात्र यातून फायदा झाला आहे. बर्फ वितळल्याने आर्क्‍टिकवरील नॉर्दर्न सी रूट या कंपन्यांना आता अधिक काळ वापरता येण्याची शक्‍यता निर्माण झाली असून मर्क्‍स कंपनीने वेंटा मर्क्‍स हे 3600 कंटेनर भरलेले जहाज या मार्गावर पाठवले आहे.

त्यामुळे आता भविष्यात या मार्गाचा अधिक वापर होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या दशकभरात पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे. यामुळे आर्क्‍टिकजवळील मार्ग दीर्घकाळ खुले राहिले तर वेळेमध्ये बचत होईल असे वाहतूक कंपन्यांना वाटते.

1 सप्टेंबर रोजी डेन्मार्कमधील मर्क्‍स कंपनीने कंटेनर भरलेले एक जहाज या मार्गावर पाठवून वाहतूक करता येईल का याची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जर ही चाचणी यशस्वी झाली तर जहाजकंपन्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. मर्क्‍सच्या या प्रयत्नामुळे भविष्यात या मार्गाच्या विकासाच्या दृष्टीने टाकलेले पाऊल आहे असे मत आर्क्‍टिक इन्स्टीट्यूटचे माल्ट हम्पर्ट यांनी व्यक्त केले आहे.

जर या मार्गावरुन प्रवास करता आला तर वेळेबरोबर खर्चातही बचत होणार आहे. रशिया आणि नॉर्वेच्या सीमेवरील मर्मंस्क येथून अलास्काच्या खाडीपर्यंत येथून जलमार्ग जातो. त्यासाठी जहाजांना रशियाची परवानगी घ्यावी लागते. पण वेळेत बचत होत असली तरी बर्फ तोडण्यासाठी वेगळा खर्च कंपन्यांना करावा लागतो. बर्फ वितळल्यास या खर्चात घट होऊ शकेल.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2013 पर्यंत आर्क्‍टीक मधून जाणाऱ्या मार्गावरुन 4 फूट जाड बर्फ तोडून जाणारी जहाजे प्रवास करु शकतील. तर 2045-2060 या कालावधीमध्ये याच वेगाने बर्फ वितळत गेल्यास सामान्य मालवाहू जहाजेही येथून प्रवास करु शकतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button