breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई मेट्रोच्या डीएन नगर-बीकेसी-मंडाले मार्गावर येणारी कुर्ला टर्मिनस आणि एमएमआरडीए मेट्रो स्टेशन रद्द करण्याचा निर्णय

मुंबई मेट्रोच्या डीएन नगर-बीकेसी-मंडाले मार्गावर येणारी दोन मेट्रो स्थानके रद्द करण्यात आली आहेत. मेट्रो विकास एजन्सी, एमएमआरडीएने व्यवहार्यतेचे पुनर्मूल्यांकन केल्यावर, वांद्रे-कुर्ला संकुलातील कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन आणि एमएमआरडीए स्टेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रो मार्गावर जिथे आधी 22 स्थानके असणार होती, आता 20 स्थानके असतील. यापैकी कुर्ला टर्मिनस एक महत्वाचे स्थानक होते, जे डीपीआर आणि मेट्रो 2 बीच्या निविदेत प्रस्तावित होते मात्र आता हे स्टेशन काढण्यात आले आहे.

हा निर्णय घेताना नेमक्या कोणत्या बाबी विचारात घेण्यात आल्य आहेत याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएचे प्रमुख आरए राजीव यांनी दिले आहेत. बीकेसी रोडच्या जंक्शनवर एमएमआरडीए मेट्रो स्टेशनची योजना होती, मात्र त्यासाठी कलानगर उड्डाणपुलाचा उतार मधे येत होता. एमएमआरडीएने एमएमआरडीए स्टेशन आणखी पूर्वेकडे हलविण्याची योजना आखली होती, मात्र त्यामुळे आयकर कार्यालय जंक्शनला समस्या उद्भवल्या असत्या.

कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन, पश्चिमेकडील मध्य रेल्वे मार्गाच्या जवळच नियोजित होते. परंतु कुर्ला टर्मिनस मेट्रो स्टेशन आणि कुर्ला रेल्वे स्थानक हे अंतर केवळ अर्धा किलोमीटरचे असल्याचे एमएमआरडीएच्या निदर्शनास आले. इथल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विहित आदर्श अंतर हे 1 किमी असणे गरजेचे आहे. त्यामुळे 500 मीटर अंतर जाण्यासाठी लोक चालत जाऊ शकतात, म्हणूनच इथे नवीन स्टेशन उभारण्याची गरज नसल्याचा विचार घेण्यात आला. कुर्ला येथील विमानतळ क्षेत्राभोवती उंची निर्बंधाचाही राजीव यांनी उल्लेख केला.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, ज्यांनी हा विषय उचलून धरला, ते म्हणाले, ‘एमएमआरडीएने कुर्ला मधील पर्यायी जागेचा विचार करायला हवा होता. रहिवाशांच्या सूचना न मागता हा निर्णय घेण्यात आला आहे.’ अनिल गलगली यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो लाइन 2 बी पश्चिम आणि पूर्व उपनगरास जोडते आणि कुर्ला स्टेशन महत्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button