breaking-newsताज्या घडामोडीपुणे

“तुमच्या हाताला मुंग्या चावल्या का?”; राज ठाकरेंना विद्यार्थिने प्रश्न विचारला अन्…

पुणे:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पुण्यामध्ये होते. येथील मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडाळाच्या कटारिया हायस्कूलमधील वास्तूचे भूमिपूजन राज यांच्या हस्ते पार पडले.राज येणार असल्याने काटारिया हायस्कूलच्या आवारामध्ये त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. पोलिसांचा बंदोबस्तही या ठिकाणी होता. शाळेतील वास्तूचे भूमिपूजन असल्याने अनेक शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

अयोध्येचा निकाल लागल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि ते कार्यक्रम स्थळाकडे निघाले. त्यावेळेस राज यांच्या हाताला असणाऱ्या बॅण्डएड पाहून एका विद्यार्थिने त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. “राजसाहेब तुमच्या हाताला नक्की काय झालं आहे? खूप दुखतयं का?,” असा सवाल तिने राज यांना केला. मात्र राज यांनी तिला काहीच उत्तर दिले नाही. तरी एवढ्यावरच न थांबता त्या विद्यार्थिनेने आपले प्रश्न सुरुच ठेवले. “राजसाहेब तुमच्या हाताला मुंग्या चावल्या का?,” असाही प्रश्न तिने राज यांना विचारला. हा प्रश्न ऐकून मात्र राज यांना हसू आले. मात्र आपले हसू गालातल्या गालात दाबत ते पुढे निघून गेले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button