breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईसह नाशिक,जुन्नर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन होण्याची शक्यता

मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून पाऊस उघडला असून अचानक तापमानात वाढ झाली आहे. यामुळे ऑक्टोबर महिना सुरु होण्याआधीच ऑक्टोबर हिट जाणवायला लागला आहे. मात्र आज मुंबईसह नाशिक,जुन्नर जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट होऊन पावसाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा अंदाज हवाान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढील काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळणार असल्यामुळे पावसाची शक्यता धुसरच आहे.

तर दुसरीकडे कोकणात दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 9,10 सप्टेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात झालेला हा बदल पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले आहे.

6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button