breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

पोटावर झोपण्याची सवय पडू शकते महाग; होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

चांगली झोप आरोग्यासाठी खुप आवश्यक असते हे आपल्या सर्वांना माहित आहे मात्र हे फार कमी लोकांना माहित असेल की झोपेसोबतच आपण झोपतो कसे यावरही आरोग्याच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. यासाठी आपण कोणत्या स्थितीत झोपतो, हे सुद्धा महत्वाचे ठरते असते. याचा आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. यातला एक प्रकार म्हणजे अनेकांना पालथे म्हणजेच पोटावर झोपण्याची सवय असते. त्यांना पोटावर झोपल्यावप गाढं झोप येते. मात्र असं झोपणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. पोटावर झोपल्यामुळे अनेक दुष्परिणाम होतात. ते काय असू शकतात ते जाणून घेवूयात.

पोटावर झोपल्याने होणारे दुष्परिणाम

१) मान सतत एकाच बाजूला राहते. यामुळे डोक्यापर्यंत रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे डोकेदुखी, मान आखडणे, मान मुरगळणे असे त्रास होतात.

२) अपस्मारीचा विकार जडण्याची शक्यता असते. अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार असून यामुळे फिट येतात.

3) चेहऱ्याच्या त्वचेला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. पिंपल्स येतात. चेहऱ्यावरही दाब पडतो.

४) रक्ताभिसरण प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नाही. स्नायूंना इजा होऊ शकते.

५) मणक्याचे आजार जडण्याचीही शक्यता असते.

६) पाठ दुखते तसेच पाठीच्या कण्याचा आकारही बदलतो.

७) अन्नपचनाचा त्रास बळावतो. पचनक्रियेवरही परिणाम होतो.

एवढच नाही तर ज्या लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते त्या लोकांच्या फक्त आरोग्यावरचं नाही तर स्वभावातही फरक जाणवू लागतो . सतत पोटावर पालथ झोपण्याच्या सवयी असलेल्या व्यक्तींमध्ये काहीशा प्रमाणात संकुचित मानसिकता तयार होते.किंवा स्वार्थी सुद्धा होऊ शकतात… पालथ झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये कमी बोलण्याचं प्रमाणही वाढत जात. त्यामुळे आरोग्य आणि आपली मानसिकता सांभाळायची असेल तर नक्कीच पोटावर पालथ झोपण्याची सवय बदलणे फायदेशीर ठरू शकतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button