breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी गावात रस्त्याच्या बाजुला पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दुचाकी वरून आलेल्या तिघांच्या टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगडाने काचांची तोडफोड केली. या घटनेत पाच ते सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार पिंपरी गावठाण येथील वाघेरे कॉलनीत मध्यरात्री घडला आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी डोळेझाक केली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडाने तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाहन पार्क करायचे का नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.

या घटनेत एकून पाच ते सहा चारचाकी वाहनांची तोडफोड झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button