breaking-newsमुंबई

मुंबईत गणेश विसर्जनासाठी आता ऑनलाईन बुकिंग करावे लागणार

मुंबई – यंदाचा गणेशोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सरकारने नागरिकांच्या केले आहे. मुंबईतही काही गणेश मंडळांची गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईत गणेश विसर्जनासाठी महापालिकेचा काही नियम सांगितले आहेत. विसर्जनावेळी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी नक्कीच या उपाय योजनेच्या फायदा होणार आहे. विसर्जनाला जाण्यापुर्वी स्थळ, दिनांक आणि वेळ ऑनलाईन बुक करावी लागणार आहे. आणि ही बुकिंग केल्यानंतर महापालिकेकडून मेसेज येणार आहे.

गणेशोत्सवात विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. गणेश मंडळांना तसेच घरगुती गणपती असणाऱ्यांना हे बुकिंग करावे लागणार आहे. shreeganeshvisarjan.com या वेबसाईटवर बुकिंग करता येणार आहे. विसर्जन स्थळावर आकार लक्षात घेत सोशल डिस्टन्स पाळले जाईल या दृष्टिकोनातून ठराविक संख्या निश्चित केली जाणार आहे. प्रत्येक अर्ध्या ताकाचे स्लॉट तयार करण्यात आले आहेत. आणि या अर्ध्या तासात बुकिंग करण्यात आलेल्या गणेशभक्तांना विसर्जनस्थळी सोडण्यात येणार आहे. मुंबईकरांचा आपल्या जवळच्याच नैसर्गिक तसेच कृत्रिम विसर्जन स्थळ निवडता येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button