breaking-newsराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नसिरुद्दीन लोन चकमकीत ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नसिरुद्दीन लोन ठार झाला, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी आज दिली. या चकमकीत आणखी एक पाकिस्तानी अतिरेकी ठार झाला असून त्याची ओळख पटली नसल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नसिरुद्दीन लोन घातपाती कारवायांमध्ये सक्रिय होता. या वर्षाच्या सुरुवातीला आरपीएफच्या ६ जवानांच्या झालेल्या हत्येत त्याचा सहभाग होता. बुधवारी झालेल्या चकमकीत लोन ठार झाल्यानंतर त्याच्याकडून एके-४७ रायफल जप्त केली आहे. ४ मे रोजी हंदवाडात आरपीएफ जवानांच्या तुकडीवर झालेल्या हल्ल्यात ३ जवान शहीद झाले होते. त्यावेळी अतिरेक्यांनी त्यांच्याकडील हिसकावलेल्या एके-४७ रायफलमधील ही एक रायफल आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button