breaking-newsमुंबई

मुंबईत उभारले एक कोटींचे आरामदायी स्वच्छतागृह

मुंबईत सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन सर्वांत महागडे  जागतिक दर्जाचे आरामदायी शौचालय उभारण्यात आले आहे. या आरामदायी शौचालयाचे उद्घाटन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. मरीन ड्राइव्ह येथील एअर इंडिया इमारतीच्या जवळ हे शौचालय उभारण्यात आले आहे. हे देशातील सर्वाधिक महागडे शौचालय असल्याचे सांगण्यात येते. ‘क्लीनटेक’ स्वच्छतागृहासाठी मुंबई महापालिका, जेएसडब्ल्यू समूह, सामाटेक आणि एनपीसीसीए यांनी पुढाकार घेतला आहे. जागतिक दर्जाचे हे शौचालय मंगळवारपासून जनतेसाठी खुले होणार आहे.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Aaditya Thackeray

@AUThackeray

I had the honour of inaugurating this world class sustainable toilet at Marine Drive, for all citizens to use. Thank you @Tarinijhanda & SamaTech for your collab with the BMC on this. Look forward to many more such toilets across Mumbai. (1/2)

हवामानाचा कोणताही परिणाम न होणाऱ्या जेएसडब्ल्यू टिकाऊ स्टील शीट्सपासून या शौचालयाचा मोनोलिथिक फॉर्म बनवण्यात आला आहे. वेदरिंग स्टील हे त्याचा टिकाऊपणा आणि मजबुती यामुळे जगभरातील सुप्रसिद्ध स्मारकांच्या आणि वास्तुंच्या बांधकामात वापरले जाते. हे शौचालय मरीन ड्राइव्हच्या समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे खारट हवा तसेच पावसाळ्यातील लाटांमुळे त्यांची झीज होणार नाही, अशा पद्धतीने बनवले आहे. स्वच्छतागृहातील सुविधा ही नॉर्वेतील जागतिक दर्जाच्या व्हॅक्युम तंत्रज्ञानावर आधारित असून ती सामाटेकने पुरवली आहे. या शौचालयाच्या प्रत्येक फ्लशमागे ९० टक्के पाण्याची बचत होणार आहे. एका फ्लशमागे केवळ ०.८ लीटर पाणी वापरले जाणार आहे. सर्वसाधारण शौचालयात प्रत्येक फ्लशमागे ७ ते ८ लीटर पाण्याचा वापर होतो.

जेएसडब्ल्यू एनर्जीने पुरवलेले सौर पॅनल्स शौचालयाच्या छपरावर लावण्यात आले आहेत. हे स्वच्छतागृह बनवताना सौंदर्यपूर्ण बांधकाम आणि इंटलिजेंट सॅनिटेशन तंत्रज्ञान यांचा संगम साधण्यात आला आहे. एका जागतिक दर्जाच्या स्वच्छतागृहाची सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button