breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विरोधकांना धक्का ! पार्थ पवार यांचा विजय पक्का !

  • पार्थ पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
  • पदयात्रेला मतदारांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. वाल्हेकरवाडी येथून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील निवडणूक विभाग कार्यालयापर्यंत जंगी पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत मतदारांची तौबा गर्दी झाली होती. उणाचा पारा चढलेला असताना देखील मतदारांनी उदंड प्रतिसाद दिला. वाल्हेकरवाडी ते बिजलीनगरच्या चौकापर्यंत अलोट गर्दी झाली होती. डीजे, ढोलताशा आणि गगणभेदी घोषणा देत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. दरम्यान, विरोधकांना एकच धक्का! पार्थ दादांचा विजय पक्का!, अशा घोषणा देण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीचे मतदान जसजसे जवळ येऊ लागले आहे. तसे कार्यकर्त्यांच्या अंतरंगात राजकीय जल्लोष संचारू लागला आहे. आपापल्या पक्षावर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांनी जीव तोडून पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. मावळ लोकसभा मतदार संघात महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत होत आहे. दोघांनीही आज जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपापला उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय कवाडे गटाच्या महाआघाडीचे उमदेवार पार्थ पवार यांची वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. त्यांच्या पदयात्रेला हजारो नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. वाल्हेकरवाडी ते बिजलीनगरपर्यंत मतदारांचा समुदाय पाठींबा दर्षविण्यासाठी एकत्रीत आला होता. यावेळी एकच वादा अजित दादा…, पार्थ पवार तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है, अशा गगणभेदी घोषणा देण्यात आल्या. ‘विरोधकांना धक्का! पार्थ पवार यांचा विजय पक्का!’ अशाही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

उमेदवार पार्थ पवार यांना पाठींबा देण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांनी पार्थ पवार यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांना मिळाला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकीकडे अलोट गर्दी असताना दुसरीकडे सत्तेतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पदयात्रेला कमी अधिक प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळाला. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणाही देण्यात आल्या. मात्र, भाजपमधील गटबाजी आणि शिवसेनेतील पदाधिका-यांची बारणे यांच्यावरील नाराजी या पदयात्रेत दिसून आली. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षाचा प्रोटोकॉल म्हणून उमेदवार बारणे यांच्यासोबत भाजपचे खासदार, आमदार दिसत असले तरी ते प्रचारकार्यात निष्ठा दाखवतील यावर स्वतः बारणे यांचा देखील विश्वास नसावा, असेच वातावरण सभोवताली घोंघावत होते.


जय पवार यांची युवकांवर छाप

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांची ‘एंट्री’ महत्वाचा विषय ठरली. त्यांचे आगमण होताच चिंचवड येथील चापेकर चौकात युवक कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यांना गाडीतून खालू उतरवून सेल्फी घेण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे जय पवार यांनी सर्वांनाच मनमोकळेपणाणे सेल्फी काढण्यासाठी वेळ दिला. त्यांच्या माध्यमातून युवकांचे नवीन नेतृत्व उदयास येण्याची चिन्हे दिसत आहेत. तर, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील बारणे यांच्या पदयात्रेत उपस्थित होते. त्यांनाही युवक शिवसैनिकांचा पाठिंबा मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button