breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांसाठी 12 रेल्वे स्थानकांवर आरोग्य चाचणी केंद्र सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

कोरोना संकटकाळात मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १२ रेल्वे स्थानकांवर आरोग्य चाचणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी रेल्वे स्थानकावर हेल्थ एव्हीएम कार्यान्वित करण्यात येतील. त्यावर मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्‌ज उपलब्ध होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर एव्हीएम बसवण्यात येणार आहे. प्रवाशाला नवीन मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्ह्‌जची आवश्यकता असेल तर कोविड-१९ प्रतिबंधात्मक स्वयंचलित वेंडिंग मशीन डिस्पेंसरमधून त्वरित मिळवता येतील. नाममात्र किंमतीत ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर बाटली आणि ग्लोव्ह्‌ज देण्यात येतील. हे एव्हीएम नवीन इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम अंतर्गत विविध स्थानकांवर उघडली जातील. आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रेल्वेगाड्यांमधून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.

प्रवाशांच्या आरोग्याच्या पॅरामीटर्सची त्वरित तपासणी करून घेण्यासाठी मुंबई विभागातर्फे कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हेल्थ एटीएम कियोस्कचे काम सुरू आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, चेंबूर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर इत्यादी १२ उपनगरी स्थानकांवर हेल्थ एटीएम बसविण्यासाठी ई-निविदा मागवल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button