breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गौतम गंभीरकडून अवघ्या एका रुपयात भरपेट भोजनाची व्यवस्था

नवी दिल्ली – भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीर हे दिल्लीकरांची ‘एक आशा जन रसोई’च्या माध्यमातून अवघ्या एका रुपयात पोटभर जेवणाची सोय करणार आहेत. दिल्लीतील गांधीनगर भागात त्यांनी ही सुविधा उपलब्ध केली असून ‘कोणीही उपाशीपोटी झोपू नये’, या भावनेतून आपण ही व्यवस्था केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गौतम गंभीर यांनी गांधीनगर भागात ‘एक आशा जन रसोई’चे उद्घाटन केले. या सामुदायिक किचनच्या माध्यमातून गौतम गंभीर फाउंडेशन एका रुपयात भोजन उपलब्ध करणार आहे. ‘आश्वासन नाही, तर शुद्ध हेतू आणला आहे, ना मंदिरातून आरती, ना मशिदीतून अजान आणली आहे, ना रामवचन, ना मोहम्मदांची दुआ आणली आहे, माणूस आहे, माणसासाठी दोन वेळचं जेवण आणलं आहे’, असं ट्विट करत गौतम यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, ‘जात-धर्म किंवा आर्थिक पार्श्वभूमी कुठलीही असो प्रत्येकाला स्वच्छ, सकस आहार मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे माझं आधीपासूनच म्हणणं होतं. त्यामुळेच बेघर आणि असहाय्य व्यक्तींना दोन वेळचं जेवणही न मिळाल्यास माझं मन तीळतीळ तुटतं’, अशा भावनाही गौतम गंभीर यांनी व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button