breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सलग चौथ्या सत्रातही कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण

सलग चौथ्या सत्रात कमॉडिटी बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झालेला पहायला मिळाली आहे. सोन्याचा भाव ०.१२ टक्क्यांनी कमी झाला असून तो ४८९१० रुपयांवर आहे. चांदीच्या किमती देखील ०.२५ टक्के घसरण झाली आहे. चांदीचा भाव किलोला ५२७६५ रुपये आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोने ४९३४८ रूपयांच्या विक्रमी स्तरावर गेले होते.

goodreturns.in या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३४० रुपये झाला आहे. तर चांदीचा भाव किलोला ५२९२० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोनं ४७९२० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९१२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेटचा भाव ४८३६० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४९९४० रुपये आहे. चेन्नईपाठोपाठ कोलकात्यात २४ कॅरेटचा भाव ५० हजारांवर गेला होता. आज चेन्नईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७०५० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ५१३४० रुपये झाला आहे. त्यात ३२० रुपयांची घसरण झाली आहे.

ऑनलाइन गोल्ड मार्केट इन इंडिया या अहवालात वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने कोव्हिड-१९ संसर्गाच्या काळातील दागिनेविक्रीचा अभ्यास केला. सराफांच्या दालनांत ग्राहकांचे येणे बंद झाल्यानंतर छोट्या सराफांपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी काही सराफांनी ऑनलाइन विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे. याचे प्रमाण सध्या अगदीच नगण्य, एक ते दोन टक्के असले तरी भावी काळात अशा प्रकारे दागिने आणि सोने-चांदी विक्रीवर अधिकाधिक भर दिला जाईल, असे कौन्सिलचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button