breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

मी सुमीतला शोभून दिसत नाही, मी कशी काळी, मी कशी जाड या कमेन्ट्सचा मला सतत सामना करावा लागला-चिन्मयी सुमीत

बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार कुशल पंजाबीने गुरुवारी संध्याकाळी मुंबईमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. यामध्येच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री चिन्मयी सुमीतने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.आणि त्यासोबतच स्वत:चंही दुखावलेलं मन व्यक्त केलं आहे.

“कुशल पंजाबीच्या आत्महत्येच्या बातमीने खूप उदास वाटतं आहे…किती आणि कुठले कुठले ताण तणाव सहन करत असतात ही कलाकार मंडळी. स्पेशली, टिव्ही आणि सिनेमातली. सततची अनिश्चितता, कामाच्या वेळेची अनियमितता, करमणूक , मनोरंजनासाठी वेळ नाही. कौटुंबिक स्वास्थ्याची पुरती लागलेली वाट.. कितीतरी गोष्टी त्यात सतत लोकांची नजर तुमच्यावर, चांगलं दिसत रहाण्याचं प्रेशर…सुरुवात कुशलबद्दल लिहून केली आहे पण मला माझ्या मनातलं काही सांगायचं आहे, मी इथे बऱ्याचदा लिहिते. माझी विचारधारा, माझा स्वभाव अगदीच अपरिचित नसावा इथे जर असेल तर हे वाचून थोडा समजेलही, अशी पोस्ट चिन्मयीने शेअर केली आहे. सोबतच तिने नवरा सुमीत राघवनविषयीही तिचं मत मांडलं असून एकंदरीत कलाकार म्हणून जगत असताना कोणत्या अडचणी येतात हेही तिने सांगितलं.


चिन्मयी सुमीतने सुरवात जरी कुशलंच्या आत्महत्येपासून केली असेन तरी शेवट मात्र तिच्या वाट्याला आलेल्या किंवा कित्येक कलाकारासोबत तसेच कोणत्याही व्यक्तीसोबत घडत असलेल्या वास्तवाबाबतचे आणि त्यामुळे होणा-या परिणामांचं भिषण सत्य दाखवून दिलं …

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button