breaking-newsमहाराष्ट्र

लातूरमध्ये कार पुलावरुन कोसळली, पाच ठार

लातूर जिल्ह्यात लातूर- मुरूड- अकोला मार्गावर सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला आहे. या मार्गावरील एका पुलावरुन कार १५ फूट खाली कोसळली असून या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

उस्मानाबादच्या कळंब तालुक्यातील डिकसळ गावातून निघालेल्या कारचा लातूर- मुरुड अकोला मार्गावर अपघात झाला. मार्गावरील पुलावरुन ही कार १५ फूट खाली कोसळली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी आणि मृतांची नावे

डिकसळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथील ज्ञानेश्वर खंदारे, परमेश्वर अंबीरकर आणि खडकी, ता. कळंब येथील गणेश सोमसे तर कोथळा, ता. कळंब येथील जगन्नाथ पवार, नाना शिंदे यांचा मृतांमध्ये समावेश आहे. शशीकांत अंबीरकर व दत्तात्रय जाधव या दोघा जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button