ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते सन्मान
माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

पिंपरी ः यंदाची ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे जिल्ह्यातील लोणीकंद – फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलच्या मैदानावर पार पडली. या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब २०२३ चा मानकरी ठरलेला गंगावेस तालमीचा पैलवान सिकंदर शेख यांनी माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पैलवान सिकंदर शेख यांना विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.
यावेळी वस्ताद श्री. अर्जुन काटे, श्री.पोपटराव जगताप, पैलवान श्री. किशोर नखाते ,पैलवान श्री.राकेश नखाते, श्री.किरण गुरव, श्री.प्रशांत पवार, श्री.हर्षद काटे, श्री.संग्राम चव्हाण, श्री.विशाल काळे, श्री.श्याम भोसले, श्री.शांताराम माने आदि उपस्थित होते.