breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बाॅलिवूड अभिनेत्रीसह तिघी विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल, ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्याने तक्रार

बीड|महाईन्यूज|

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडी भारती सिंग आणि फिल्म मेकर फराह खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. तिघींच्या विरोधात बीड शहरातील शिवाजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बॅक बेंचर्स’ या कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या पवित्र ग्रंथ बायबलमधील ‘हलेलूया’ या पवित्र शब्दाचा अश्लिल उच्चार करून ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. या प्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आल्फा ओमेगो ख्रिश्चन महासंघाचे राज्य अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुन्हा दाखल केला.

फराह खान, रवीना टंडन, भारती सिंग या तिघींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा घराबाहेर निघू देणार नाही, असा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आहे. तिघींना तत्काळ अटक करा, अशी मागणीही जोर धरत आहे.

वादग्रस्त व्हिडीओनंतर रवीना टंडनचा माफीनामा

रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंह यांच्या विरोधात नुकतीच एफआयआर दाखल करण्यात आली होती. या तिघांनी एका शोमध्ये ख्रिश्चन बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या तिघींवरही करण्यात आला होता. या तिघींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणावर अभिनेत्री रवीना टंडननं माफी मागत ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button