breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार 24 डिसेंबरला,शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार

मुंबई | महाईन्यूज |

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार उद्या म्हणजेच 24 डिसेंबरला होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी 2 अशा 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. 28 नोव्हेंबरला शपथविधी झाल्यानंतर, 12 डिसेंबरला खातेवाटप झालं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आलं होतं . मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान 24 डिसेंबरला दुपारनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित झालं आहे. यानुसार उद्या शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. दोन्ही पक्षांची विस्ताराची यादी तयार करण्यात आली आहे . मात्र काँग्रेसकडून कोणाला मंत्रिपदं द्यायचं यावरुन खल सुरु आहे. काँग्रेसचे नेते आज दिल्लीला गेले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून ते आज पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वरिष्ठ नेत्यांची दिल्ली दरबारी चर्चा होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button