breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

“मी माझ्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही”- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘मी डोनाल्ड ट्रम्प नाही. मी माझ्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही,’ असे भावनिक उद्दगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन संदर्भातील एका प्रश्नावर दिले.उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’साठी एक मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. येत्या २५ व २६ जुलै रोजी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीबद्दल शिवसेनेचे खासदार व ‘सामना’चे कार्यकारी संपादक राऊत यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील जनतेला सतावणाऱ्या लॉकडाऊनच्या समस्येवर मुख्यमंत्री ठाकरे या मुलाखतीत सविस्तर बोलले आहेत. लॉकडाऊनला लोक कंटाळले आहेत, असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लॉकडाऊनची गरज पटवून दिली आहे. ‘मी कोरोनासोबत जगायला शिकलो आहे. सगळ्यांनीच शिकायला पाहिजे. शहाणे व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण प्रयत्न करत आहोत,’ असही त्यांनी म्हटलंय. ‘मी डोनाल्ड ट्रम्प नाही. मी माझ्या माणसांना तळमळताना पाहू शकत नाही,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी दिलं आहे. ‘लॉकडाऊन आहेच. त्यामुळंच ह्याच्यानंतर काय होणार, त्याच्यानंतर काय मिळणार याला अर्थ नाही. आपण हळू हळू एक एक गोष्ट सोडवत चाललो आहेत,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. ‘सरकार म्हणून मी काही गोष्टी जरूर करणार. मला एखादी गोष्ट पटली तर ती करताना मी टीकेची पर्वा कधीच करत नाही. असही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला यापूर्वी अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, त्या मुलाखती एका पक्षाचे प्रमुख म्हणून होत्या. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. त्यात राज्य सरकारबद्दलचे अनेक प्रश्न आहेत. संजय राऊत व ‘सामना’च्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओतून त्याचा अंदाज सहज लावता येतो. या व्हिडिओतील प्रश्नांमुळं मुलाखतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button