breaking-newsपुणे

पुण्यात क्वारंटाईन केंद्रातील सुरक्षारक्षकानेच केला महिलेचा विनयभंग

पुणे : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्रात तेथील सुरक्षारक्षकानेच एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . संबंधित सुरक्षारक्षकाने या महिनेला वारंवार मिस्ड कॉल, अश्लील फोन-मेसेजस करुन मानसिक त्रास दिला. तसेच रात्रभर खोलीचा दरवाजाही ठोठावल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यात सिंहगड रोड परिसरात क्वारंटाईन केंद्र आहे. या ठिकाणी महिलांनाही क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूकही करण्यात आली. मात्र, सध्या या क्वारंटाईन केंद्रातील महिला कक्षात ही महिला एकटीच उपचार घेत होती. याचाच फायदा घेऊन महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच या महिलेचा विनयभंग केला. यामुळे एकच खळबळ उडाली.

यामुळे संबंधित महिला प्रचंड घाबरली. आरोपीने पीडित महिलेला वारंवार मिस्ड कॉल दिला. तसेच फोन करुन अश्लीलपणे बोलला. यानंतर रात्रभर महिला थांबलेल्या खोलीचा दरवाजा देखील ठोठावला. यानंतर अखेर 27 वर्षीय पीडित महिलेने पोलीस ठाण्यात आरोपी सुरक्षरक्षकाची तक्रार केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकाला अटक आहे. लोकेश मते असं या सुरक्षारक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button