breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भर दिवसा गोळीबार; तीन गोळ्या पोटात लागल्याने फार्म हाऊसचा व्यवस्थापक गंभीर जखमी

पिंपरी । फार्म हाऊसच्या व्यवस्थापकावर अज्ञातांनी भरदिवसा गोळीबार केला. ही घटना आज (दि. 22) सकाळी साडेनऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील वाहनगाव जवळ घडली आहे. व्यवस्थापकाच्या पोटात तीन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  मिलिंद मणेरीकर (वय 50, रा. तळेगाव) असे जखमी व्यवस्थापकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मिलिंद मणेरीकर हे वाहनगाव जवळ असलेल्या संकल्प फार्म हाऊस येथे व्यवस्थापक म्हणून काम करतात. मणेरीकर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे सहकारी चेतन निमकर यांच्यासोबत कारमधून फार्महाऊसवर जात होते.

वाहनगावजवळ गेले असता त्यांच्या कारच्या मागून एका मोटारसायकल वर अज्ञात दोघेजण आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट देखील नव्हती.

त्यांनी मणेरीकर यांच्या कारला हात दाखवून थांबवले. मणेरीकर यांना हांडी फार्म हाऊस कुठे आहे ? असे आरोपींनी विचारले. त्यांना हांडी फार्म हाऊसचा पत्ता सांगण्यासाठी मणेरीकर यांनी कारची काच खाली घेतली. त्यानंतर आरोपींनी मणेरीकर यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये मणेरीकर यांच्या पोटात तीन गोळ्या लागल्या आहेत. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भरदिवसा झालेल्या या गोळीबार प्रकरणामुळे संपूर्ण मावळ परिसर हादरून गेला आहे. वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button