breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत’, असदुद्दीन ओवेसी असं का म्हणाले ?

मुंबई – भाजपाची बी टीम असा आरोप एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्यावर केला जातो. मात्र, यावर “मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत”, अशा शब्दांत त्यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे.

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते बोलत होते. ओवेसी म्हणाले, “सर्व राजकीय पक्ष माझा आणि माझ्या पक्षाचा मुद्दा बनवून त्याचा राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात असतात. बिहारमध्ये काँग्रेसने आमच्यावर आरोप केला की आम्ही भाजपाची बी टीम असून आम्ही मतं कापण्याचं काम केलं. इथं हैदराबादमध्ये काँग्रेस म्हणते ओवेसींना नाही, तर आम्हाला मतदान करा. तर, भाजपाचं दुसरचं काहीतरी चाललं आहे. पण मला कुणाचीही फिकीर नाही. या आरोपांप्रमाणे मी एक लैला असून माझे अनेक मजनू आहेत. म्हणजेच विरोधक आम्हाला मुद्दा बनवून मत मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. हैदराबादची जनता हे पाहते आहे की, असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष हैदराबादला हरप्रकारे चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब आता जनताच निश्चित करेल.”

अमित शाह यांचे सल्लागार अंधळे-बहिरे आहेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पत्रकार परिषदेत घेऊन ओवेसी यांच्यावर आरोप केला. हैदराबादमध्ये पूर आला तेव्हा ओवेसी आणि टीआरएस कुठे होते, असा सवाल शाह यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना ओवेसी म्हणाले, “अमित शाह यांचे जे सल्लागार आहेत ते अंधळे-बहिरे आहेत. पूरावेळी अकबरुद्दीन ओवेसींनी साडेतीन कोटींची मदत केली. असदुद्दीन ओवेसी रोज गुडघाभर पाण्यात फिरत होते. आमच्याजवळ याचे फोटो आहेत. आम्ही लोकांचा जीव वाचवत होतो. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत काम करत प्रत्येक पीडित कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत मिळवून दिली.”

तेव्हा भाजपा झोपली होती काय ?

ओवेसी म्हणाले, “अमित शाह हैदराबादच्या जनतेशी खोटं बोलले आणि त्यांना एकाही रुपयाची मदत मिळवून दिली नाही. कर्नाटकातील पूरावेळी त्यांनी निधी दिला अशीच मदत जर हैदराबादच्या पीडितांना मिळाली असती तर प्रत्येक कुटुंबाला ८० हजार रुपये मिळाले असते. पण आपण एकही पैसा दिला नाही आणि आम्हाला प्रश्न विचारता. आम्ही मदत कार्यावेळी ना हिंदू पाहिला ना मुस्लिम. प्रत्येक व्यक्तीची मदत केली, त्यावेळी भाजपा झोपली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button