breaking-newsताज्या घडामोडीपुणे

District Updates Pune : विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे विभागातील 3 हजार 321 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 823 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 178 आहे. विभागात कोरोना बाधीत एकुण 324 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 210 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयात 5 हजार 616 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 444 आहे. कोरोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 336 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 249, सातारा जिल्ह्यात 37, सोलापूर जिल्ह्यात 22, सांगली जिल्ह्यात 3 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातारा जिल्हयात 278 कोरोना बाधीत रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 157 आहे. कोरोना बाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 570 कोरोना बाधीत रुग्ण असून 249 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 275 आहे. कोरोना बाधित एकूण 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 73 कोरोना बाधीत रुग्ण असून 40 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 286 कोरोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 271 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 71 हजार 111 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 62 हजार 159 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 966 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 55 हजार 253 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 6 हजार 823 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 31 लाख 30 हजार 901 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 5 कोटी 84 लाख 54 हजार 69 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 758 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button