breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती’, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

मुंबई – ‘तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे’, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले. राऊत यांच्यावर टिका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांना दररोज वेगवेगळी विधानं करून अडचणीत आणत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच प्रिय आहेत.

सामना म्हणजे संजय राऊत, संजय राऊत म्हणजे सामना असं आहे का ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला होता. त्यांच्या विधानाचा समाचार घेत राऊत म्हणाले की, ‘तुमच्या कानाला आणि डोळ्याला त्रास व्हावा, म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे आणि माझी नियुक्तीही खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली आहे’, असा टोला लगावला.

‘ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था या चीन सारख्या सीमेवर पाठवाव्यात. कारण त्या दुष्मनांना जेरीस आणतात, त्यांना विरोधकांविरोधात कसे काम करायचे हे चांगले माहिती आहे’, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

‘ऊर्मिला मातोंडकर या मुळच्या शिवसैनिकच होत्या. कदाचित मंगळवारी त्या पक्षात प्रवेश करतील. तसेच, ‘पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगाला आदर्श दाखवून दिला. इतक्या शांततेने आंदोलन केलं आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पोलीस बळाचा वापर केला. तो वापर चीनसाठी केला असता तर लडाखमध्ये चीन सैन्य घुसले नसते’, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button