breaking-newsआरोग्यपुणेमहाराष्ट्र

मासिक पाळीतील दुखण्यावर औषध

आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी

सत्र परीक्षेच्या दरम्यान मासिक पाळीच्या दुखण्यामुळे हैराण झालेल्या वर्गमैत्रिणीचे दुखणे पाहून त्यावर सर्वसामान्य महिलांना परवडेल अशा किमतीत वेदनाशामक रोल ऑन औषधाची निर्मिती करण्याची कामगिरी आयआयटी दिल्ली येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक महिला दिनी हे औषध बाजारात दाखल करण्यात आले.

आयआयटी दिल्ली येथे बी. टेक. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या अर्चित अगरवाल आणि हॅरी सेहरावत हे विद्यार्थी आणि प्राध्यापक डॉ. श्रीनिवासन वेंकटरामन यांच्या एकत्रित प्रयत्नातून ‘सांफे रोल ऑन’ हे वेदनाशामक औषध विकसित करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अत्यावश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून या औषधाच्या वापरातून कोणतेही दुष्परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

वैद्यकीयदृष्टय़ा गुणकारक असलेल्या तेलांचा वापर करून हे औषध बनवण्यात आले आहे. मासिक पाळीच्या काळात ओटीपोट, पाठ आणि पायांमध्ये होणाऱ्या असह्य़ वेदनांवर या औषधाचा वापर केला असता वेदना कमी होणे शक्य असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. दहा मिलीच्या दहा रुपये किमतीच्या पॅकिंगमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे.

अर्चित अग्रवाल म्हणाला,की सुमारे चाळीस टक्के महिलांना मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या दुखण्याच्या त्रासामुळे दैनंदिन कामकाजापासून लांब राहावे लागते. आमच्या वर्गमैत्रिणीला सत्र परीक्षेच्या काळात झालेल्या मासिक पाळीच्या त्रासामुळे परीक्षा देता आली नाही हे पाहिले तेव्हा त्यावर औषध तयार करण्याची गरज प्रकर्षांने जाणवली. सात महिन्यांहून अधिक काळ यावर संशोधन केले. हे औषध संपूर्ण नैसर्गिक घटकांपासून तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या औषधाच्या वापरातून कोणतेही दुष्परिणाम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने देखील यावर शिक्कामोर्तब केले आहे.

अत्यंत नैसर्गिक अशा मासिक पाळीमुळे होणारा त्रास महिलांच्या दैनंदिन जीवनात अडथळा ठरता कामा नये, या भावनेतून या औषधाची निर्मिती करण्यात आल्याचे आयआयटीचे प्राध्यापक डॉ. वेंकटरामन यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button