breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus |मानवावर पहिला प्रयोग केला, सहा दिवस निरिक्षणाखाली

नवी दिल्ली | कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे याकरता जगभरात संशोधन सुरू आहे. त्यातच भारत बायोटेक या फार्मा कंपनी विकसित करत असलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली असून ३० वर्षीय तरुणावर पहिला डोस देण्यात आला आहे. आता, या स्वयंसेवकाला निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

दोन तासांचे निरिक्षण झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्या येणार आहे. तसंच, त्याच्यावर पुढील सहा ते सात दिवस विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित ३० वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती. मानवी चाचणी कऱण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी तयारी दर्शवली होती. त्यातून या व्यक्तीची निवड करण्यात आली.

हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनीकडून COVAXIN लस तयार केली जात असून यासाठी त्यांनी आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी यांच्याशी करार केली आहे. नुकतंच त्यांना केंद्रीय औषध नियंत्रण विभागाकडून (डीसीजीआय) मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली होती.

या लसीचा प्रयोग पहिल्या टप्प्यात ३७५ जणांवर केला जाणार आहे. यामध्ये एम्स रुग्णालयातील १०० जण असणार आहेत. एम्सच्या एथिक्स कमिटीकडून चाचणीला मंजुरी मिळाल्यानंतर स्वयंसेवक बनण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासातच एक हजारापेक्षा जास्त जणांनी स्वयंसेवक बनण्यासाठी संपर्क साधला होता.

पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी निरोगी आणि सदृढ व्यक्तींची निवड केली जाणार असून यामध्ये १८ ते ५५ वयोगटातील व्यक्ती असणार आहेत. यामध्ये गर्भवती नसणाऱ्या महिलांचाही समावेश असणार आहे. चाचणीसाठी तयार झालेल्या उमेदवारांना या लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. त्यानंतर १४ दिवसांनी पुढचा डोस देण्यात येणार आहे. लसीच्या परिणामांबाबत निश्चित केलेला कालावधी संपल्यानंतर ज्यांच्यावर चाचणी केली त्या स्वयंसेवकांना तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. COVAXIN च्या वैद्यकीय चाचणीसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या १२ ठिकाणांपैकी दिल्लीतील एम्स हे हे एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व १२ ठिकाणांवरील एकूण ७५० जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button