breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संविधान भवनासाठी वास्तूविशारद आणि प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भारतीय संविधानाबाबतची सखोल माहिती सर्वसामान्यांना व्हावी आणि त्याबाबतची साक्षरता वाढीस लागावी, यासाठी भोसरीत संविधान भवन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठीच्या वास्तूविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया प्राकिरणातर्फे सुरू करण्यात आली आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून याबाबतची माहिती दिली. त्यामध्ये नमूद आहे की, देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणार आहे. खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगाताप, आमदार महेश लांडगे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी त्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे संविधान भवन उभारण्यात येणार आहे. प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 11 मधील 5 एकर जागेवर प्रशस्त संविधान भवन उभारण्यात येणार आहे.

संविधान भवन उभारण्याबाबत प्राधिकरणातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वास्तूविशारदासह प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पाचे नकाशे आणि अंदाजपत्रक तयार करून घेतल्यानंतर यासाठीची निविदा प्रसिध्द करण्यात येणार आहे, अशी माहिती सदाशिव खाडे यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button