breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळ लोकसभेची जागा युतीतून भाजपला सोडणार?

  • पालघरच्या बदल्यात मावळच्या जागेवर भाजपचा दावा
  • मावळात भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप रिंगणार उतरणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीचं घोड अखेर गंगेत न्हालं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे. भाजपने शिवसेनेला पालघर लोकसभेची जागा देण्याचे मान्य केले असून त्या बदल्यात मावळ लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला आहे, अशी विश्वसनीय सुत्रांकडून कळते.

शिवसेना-भाजपने विधानसभेसाठी 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांचं एकमत झालं आहे. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनाला 23 तर भाजपला 25 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यासंर्दभात गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत युतीच्या चर्चेत जळगाव, भिवंडी आणि पालघर या तीन जागांपैकी एक जागा द्यावी, अशी मागणी शिवसेनेने भाजपकडे केली होती. आता पालघरची जागा भाजपने शिवसेनेला द्यायचे मान्य केले आहे. पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष विरोधात लढले होते आणि भाजपने विजय मिळविला होता. मात्र, आता ही जागा सेनेला देण्याचे भाजपने मान्य केले असून, पालघरच्या बदल्यात भाजपने सेनेकडे मावळची मागणी केली आहे. मात्र, या मागणीवर सेनेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे कळते.

मावळमध्ये सेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार असून, पिंपरी-चिंचवडचे लक्ष्मण जगताप यांच्यासाठी ही जागा भाजप सेनेकडे मागत आहे. मावळ हा रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा आणि पुणे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघानी बनलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button