breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ताई, आता बस्स कर! फक्त महाराज इंदोरीकर; सोशल मीडियावर महाराजांच्या समर्थनार्थ गाण्याचा धुमाकूळ

मुंबई | महाईन्यूज

गर्भलिंग निदान वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ तरुणाई पुढे सरसावली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक क्रेझ असणाऱ्या इंदोरीकर महाराजांवर नवीन गाणं काढण्यात आलं आहे. या गाण्याला तरुणाई सर्वात जास्त पसंती देत आहे. ताई, आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर अशा शब्दात असणाऱ्या या गाण्यावर तरुणाई थिरकत आहे.

https://youtu.be/uXCz6khWKLo

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे महिलांचा अपमान झालेला असून त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अहमदनगर येथे जाऊन त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न झाल्यास त्यांना काळं फासू असा इशारा दिलेला होता. मात्र इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना उतरल्या, तसेच टिकटॉक या प्रसिद्ध अ‍ॅपवरही तरुणाईने इंदोरीकर महाराजांना पाठिंबा दिला आहे.

तृप्ती देसाई यांच्या निषेधासाठी आणि इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ हे नवीन गाणं व्हायरल झालंय, यामध्ये ताई आता बस्स कर, फक्त महाराज इंदोरीकर असं म्हणत इंदोरीकरांनी समाज प्रबोधनासाठी केलेलं काम, तसेच तमाशापुढे बसणारा समाज आज कीर्तनासमोर बसायला लागला याचं श्रेय इंदोरीकर महाराजांचे आहे. त्यामुळे त्यांची बदनामी करणं बंद करा अशा आशयाचं गाणं प्रसिद्ध झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button