breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवनगर विकास प्राधिकरणाच्या घरांचा प्रकल्प स्थलांतर करा, भाजप नगरसेवकांची मागणी

विकास कामांबाबत स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्या, सीईओंना सूचना 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर ६ येथे जलवायुविहार सोसायटी शेजारील एल.आय.जी. करीता भुखंड क्र. ३०,३१,३२, ३३ ते ३९ आणि ६१ ते ७६ येथे आणि इ.डब्ल्यु.एस. करीता भुखंड क्र. ४० ते ४५, ४१, ४७ ते ६० या प्लॉटवर या दोन्ही ठिकाणी स्कीम प्रस्तावीत करुन कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक लोकप्रतिनीधी म्हणुन आम्हाला या दोन्ही प्रोजेक्ट संदर्भात प्रस्ताव सादर केल्यापासुन ते कामाचा आदेश देवून काम सुरु होईपर्यंत विश्वासात घेतले नाही, तसेच कोणत्याही प्रकारची पुर्व कल्पना देण्यात आली नाही. अशी तक्रार नगरसेवक विलास मडिगेरी यांनी शनिवारी (दि.१६) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या कार्यालयात पत्र दिले. ते बाहेरगावी गेल्याने त्यांच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश कुमार खडके यांच्याकडे हे पत्र देण्यात आले. त्याबाबत नगरसेवक मडीगेरी यांनी प्राधिकारणाचे अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.

सेक्टर क्र. ४,६,९,११,१३ या भागामध्ये प्राधिकरणाकडून सेक्टर ४ मध्ये एकमात्र टेनिसकोर्टची व सेक्टर ९ येथील बास्केट बॉलची उभारणी करुन महापालिकेकडे वर्षभराच्या कालखंडात हस्तांतरीत केला आहे. नुकतेच सेक्टर ४ येथे साईनाथ हॉस्पिटलच्या मागे प्राधिकरणाद्वारे एक एकर मध्ये उद्यान विकसीत करणे काम सुरु केले आहे. सेक्टर ४ ट्रॅफिक पार्क समोरील मोकळा भुखंड प्राधिकरणाकडुन मनपाकडे हस्तांतरीत केल्याने सदर भुखंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आमच्या प्रयत्नाद्वारे ३० हजार चौ.फुटामध्ये उद्यान विकसीत करणेचे काम प्रगतीपथावर आहे. या वरील चार प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य सुविधा सेक्टर ६ मधील नागरीकांसाठी क्रीडांगण व उद्यानाची एकही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरीकांमध्ये अंसतोष असल्यामुळे वारंवार आमच्याकडे मागणी होत आहे. त्यामुळे आपल्या मार्फत सेक्टर ६ मध्ये उद्यान व क्रीडांगण त्वरीत विकसीत करणेचे दृष्टीने पावले उचलावीत किंवा अशा प्रकारचे प्लॉट महापालिकेकडे हस्तांतरीत केल्यास पालिकेमार्फत विकसीत करण्याचे प्रयत्न राहील.

सदर सेक्टर क्र. ४,६,९,११,१३ येथे आपल्या प्राधिकरणाकडुन विविध सोसायट्याना खुप मोठ्या प्रमाणात प्लॉट विक्री करण्यात आली. तसेच या सर्व सेक्टर मधील शेकडो सोसायट्या उभारणेत आल्या असुन तेथे नागरीक मोठ्या प्रमाणात राहत असुन त्या भागांमध्ये नागरीकांच्या सोई-सुविधांच्या दृष्टीने क्रीडांगणे, उद्यान, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, इतर अनुषंगिक बाबीचा विचार केला गेला नाही.
 
सदर एल.आय.जी. आणि ई.डब्ल्यु.एस. स्कीमचे काम सुरु केले असल्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सोसायटी आणि नागरीक एकत्र येऊन काम चालु असलेल्या ठिकाणी या दोन्ही स्कीमच्या विरोधात आंदोलन करणेच्या भुमिकेत आहेत असे घडल्यास या भागातील वातावरण व कायदा सुव्यवस्था बिघडु नये, यासाठी काळजी व दक्षता म्हणुन चालु केलेल्या एल.आय.जी. आणि ई.डब्ल्यु.एस. कामास स्थगिती देवुन सदर प्रोजेक्ट सेक्टर ६ ऐवजी सेक्टर क्र. १२ येथील पंतप्रधान आवास योजना स्कीमच्या जवळपास किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावा.

दरम्यान, केंद्र व राज्य या दोन्ही शासन स्तरावर प्रत्येकाला घर देण्याची संकल्पना असुन विविध ठिकाणी कमी उत्पन्न गटातील सर्व लोकांना घर देण्याची योजना राबवित आहे. त्या भुमिकेस सताधारी पक्षाचा एक जबाबदार नगरसेवक म्हणुन माझा अशा प्रकारच्या प्रोजेक्टला पाठींबा असून सदर प्रकल्प फक्त सेक्टर क्र. ६ ऐवजी सेक्टर १२ येथील पंतप्रधान आवस योजना स्कीमच्या जवळील जागेत स्थलांतरीत करणेबाबत आमची आग्रही मागणी आहे. तसेच सदर प्रकल्पाच्या स्थलांतराचा विचार न केल्यास सेक्टर ६ मधील स्थानिक नागरीकांच्या भुमिकेबरोबर आम्हाला उभे राहावे लागेल. तरी या प्रकल्पास त्वरीत स्थगिती देण्यात यावी, तसेच सेक्टर ६ ऐवजी अन्यत्र स्थलांतरीतचा निर्णयआपल्या अधिकाराखाली किंवा शासन स्तरावर लवकरात लवकर घ्यावा, असे निवेदन नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button