breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PCMC : भक्ती-शक्ती चाैकात पुन्हा राष्ट्रध्वज फडकणार

पावसाळा वगळून आठ महिने फडकणार झेंडा, 12 नवीन राष्ट्रध्वजाची होणार खरेदी  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – निगडीच्या भक्ती-शक्ती चाैकात उभारलेल्या खांबावरील राष्ट्रध्वज काही तांत्रिक कारणास्तव गेली आठ महिने खाली उतरविण्यात आला होता. मात्र, आज (सोमवारी) महापालिकेकडून राष्ट्रध्वज पुन्हा फडकविण्यात आला आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये म्हणून पावसाळ्यातील चार महिने वगळून आठ महिने हा राष्ट्रध्वज कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली. 

पिंपरी चिंचवड महापालिकेने भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यान परिसरात सुमारे 107 मीटर उंचीचा खांब उभारुन त्याठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविला होता. 26 जानेवारी 2018 रोजी प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचे उद्घाटन करण्यात आले.  मात्र, राष्ट्रध्वजाची उंची सर्वाधिक असल्याने वा-याच्या वेगाने झेंड्याचे कापड फाटू लागले होते. त्यामुळे महापालिकेकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होवू नये, याकरिता तो खाली उतरविला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजपला यावरुन विरोधकाकडून टिकेला सामोरे जावे लागले.

याबाबत महापालिका प्रशासनाने वाघा बाॅर्डरवरील झेंड्याबाबत माहिती मागविली. तसेच तेथील राष्ट्रवध्जाच्या कापडाची माहिती घेवून त्याच दर्जाचा राष्ट्रध्वजाच्या खरेदीविषयी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 60 बाय 90 फुटांचा राष्ट्रध्वज मागविला आहे. त्यांच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे. त्यानूसार 12 राष्ट्रध्वजाची खरेदी करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button