breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेनेच्या त्या बंडखोर आमदारांना ‘या’ कारणांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची सोबत नको!

नाशिक/ पुणेः एकनाथ शिंदे (Eknath Shinde rebel) यांच्या बंडाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० ते ५० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार (MVA Government) संकटात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांना इतक्या आमदारांचे समर्थन कसं मिळाले? हा सध्या चर्चेचा विषय आहे. शिवसेना आमदारांना राष्ट्रवादी-काँग्रेससोबत आघाडी नको, अशी चर्चा दबक्या आवाजात असली तरी त्याचे कारण समोर आलं आहे. एकनाथ शिंदे यांना ४० ते ५० आमदारांचा पाठिंबा आहे. या सर्व आमदारांची एकच मागणी आहे ती म्हणजे शिवसेनेनं राष्ट्रवादी-काँग्रेससोबतच्या सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जावं. मात्र, शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादी- काँग्रेसला विरोध का होतोय, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होतोय. काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहिल्यास भविष्यात आपले मतदारसंघ गमावून बसू अशी भिती सेना आमदारांना वाटत आहे. शिवसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीत मला पक्षाकडून तिकीट मिळेलच याची खात्री नाही. कारण महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे उमेदवार त्या मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. जर, आमच्या नेतृत्वाने त्यांना पाठिंबा दिल्यास मी माझा मतदारसंघ गमवेन. जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा असं होतं नव्हतं. भाजप उमेदवाराने कधीच माझ्या मतदारसंघावर दावा केला नाही, असं एका सेना खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर म्हटलं आहे. या वर्षाच्या अखेरीस किमान १० महानगरपालिकांच्या निवडणुका आणि अनेक ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे सेना आमदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिवसेना नेत्यांना आगामी निवडणुका लढवण्यासाठी आपला मतदारसंघ व कार्यकर्ते गमावून बसू ही चिंता आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत लढली. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनातही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत मतभेद आहेत. तसंच, भाजपप्रमाणे निवडणूकीत जागा वाटून घेणे शक्य होणार नाही, असं एका वरिष्ठ नेत्याने म्हटलं आहे.

लोकसभा आणि विधानसभेत आपण जिंकलेल्या जागांवर सत्ता सत्तेत असलेल्या मित्रपक्षांकडून दावा सांगितल्यास पक्षनेतृत्व त्यांच्यासाठी काही जागा सोडू शकते, अशी शक्यता बंडखोरांना वाटते. जर पक्षनेतृत्वाने तसं केल्यास विद्यमान खासदार आणि आमदार अपक्ष म्हणून लढू शकतात किंवा त्यांच्या जागा राष्ट्रवादी किंवा काँग्रेससाठी सोडू शकतात, असे सेनेचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले. भाजप आणि शिवसेनेची युती असताना निवडणुकीत कोणतीही अडचण येत नव्हती. कारण प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांवर कधीही दावा केला नाही, असंही एका सेना नेत्यानं म्हटलं आहे. मुक्ताईनगरमध्ये स्थानिक नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते.परंतु, ही जागा भाजपसाठी राखून ठेवल्यामुळे त्यांना नकार देण्यात आला होता. नंतर, त्यांनी राजीनामा दिला, अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि भाजपच्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला. उत्तर महाराष्ट्रातील सेनेचे पाचही आमदार- जळगावचे चार आणि नाशिकचा एक आमदार राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध लढले होते. “आम्ही अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी लढत आहोत कारण ते आमचे आधीपासूनचे प्रतिस्पर्धी आहेत. भाजप हा सेनेचा मित्र आहे,” असे शिंदे यांना पाठिंबा असलेल्या अपक्ष आमदाराने म्हटलं आहे.

  • गाव-पातळीवरील आमदारांकडे दुर्लक्ष

गाव- पातळीवर शिवसेना पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते व नेत्यांनी धडपड केली. त्याचा परिणाम २००४, १००९ आणि २०१४च्या निवडणूकीत दिसून आला. निवडणूकीत मिळवलेल्या यशाचा गौरव हा सत्तेत मंत्रिपद देऊन करता येतो, हे ग्रामीण भागातील आमदारांच्या लक्षात आहे. पण त्या आमदारांना मतोश्रीवरील निर्णय प्रक्रियेचा भाग होता येत नाही, हे लक्षात आल्यावर मातोश्री आणि ग्रामीण भागांतील आमदार यांच्यातील दरी वाढत गेली. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे ग्रामीण भागातील आहे. यामध्ये कृषी मंत्री दादा भूसे पाटील, शंभूराज देसाई, प्रदीप जैस्वाल आणि मराठवाड्यातील ८ ते १० आमदार आहे. तर, कोकण विभागातील योगेश कदम, खेडमधील आमदार , दीपक केसरकर यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button