breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ लोकसभा निकालासाठी २९ फेऱ्या, निवडणुक अधिका-यांनी घेतला आढावा

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे. यावेळी एकूण मतदानापैकी पाच टक्के व्हीव्हीपॅटची मते मोजायची असल्याने अंतिम निकालास रात्र होणार आहे. चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने मतमोजणीसाठी १४ ऐवजी अधिकचे टेबल मांडण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी ८४ मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर होतील. मतमोजणीच्या वेळी संपूर्ण व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाला विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्राँग रूम उघडण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी आठला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएमच्या मोजणीला सकाळी साडेआठला सुरुवात होईल.

चिंचवडमध्ये २ लाख ८३ हजार ४ मतदारांनी, तर पनवेलमध्ये २ लाख ९८ हजार ३४९ मतदारांनी हक्क बजाविला आहे. १४ टेबलवर मतमोजणी करायची ठरविल्यास चिंचवडसाठी ३४, तर पनवेलसाठी ४२ फेºया होणार आहेत. एका फेरीला ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी गृहीत धरल्यास मावळ लोकसभेच्या निकालासाठी रात्र होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे. मतमोजणीसाठी चिंचवडसाठी २० टेबल, तर पनवेलसाठी २४ टेबल मांडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. आयोगाने मान्यता दिल्यास विधानसभा मतदारसंघनिहाय फे-या होतील.
….
टेबल वाढविल्यास फे-या, वेळ कमी लागणार
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना केली आहे. विधानसभानिहाय १४ टेबलची मांडणी केली आहे. त्यानुसार सुमारे २५ ते ४२ फेºया होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button