breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अखेर आजपासून ‘पबजी’ भारतातून हद्दपार

नवी दिल्ली – पबजी खेळणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. भारतात आजपासून पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट हे दोन्ही गेमिंग ऍप्स पूर्णपणे बंद होणार आहेत. पबजी मोबाईल गेमचे मालकी हक्क असणाऱ्या टॅन्सेंट गेम्स या कंपनीने गुरुवारी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली.

चीनकडून सुरक्षेचा धोका पाहता पबजीसह ११८ चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने २ सप्टेंबरला घेतला. या ऍप्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा डेटा गोळा केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांसोबतच देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो, असे सरकारने ऍप्स बंदीचा निर्णय जाहीर करताना सांगितले. त्यानंतर या ११८ ऍप्सवर भारतात बंदी घालण्यात आली. त्यानंतर अखेर आजपासून पबजी भारतातून पूर्णपणे हद्दपार होत आहे. याबाबत कंपनीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय, ‘पबजी गेम भारतात पूर्णतः बंद केला जातोय, ही फार खेदाची बाब आहे.’ यासोबत त्यांनी भारतातील पबजी मोबाईल आणि पबजी मोबाईल लाईट या गेमच्या चाहत्यांचे आणि गेमचे समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

तसेच कंपनीने म्हटले आहे की, ‘आमच्या युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवणे ही नेहमीच आमची प्राथमिकता राहिली आहे. आम्ही नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे.’ टॅन्सेंट गेम्सने निवेदनात असेही म्हटले आहे की, ‘आमच्या प्रायव्हसी पॉलिसित असे सांगितले आहे, सर्व युजर्सची गेमप्ले माहिती पारदर्शक पद्धतीने प्रोसेस केली जाते.’ त्याचबरोबर टॅन्सेंट कंपनी पबजी मोबाईल विकसित करणारी कंपनी पबजी कॉर्पोरेशनला (क्राफ्ट्स गेम यूनियनच्या मालकीची कंपनी) सर्व हक्क परत करत आहेत.

दरम्यान, टॅन्सेंट पबजी ऍपच्या माध्यमातून भारतात सर्वाधिक कमाई करत होती. दररोज या कंपनीला तब्बल ३ कोटी ऍक्टिव्ह युजर्स जोडले जात होते. परंतु भारतात चीनच्या ११८ ऍप्सवर बंदी आणल्यानंतर या कंपनीचा बाजार भाव जवळपास ३४ अरब डॉलरने घसरला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button