breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

माळशेज घाटात दरड कोसळली, वाहतूक बंद

माळशेज घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली असून सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटवण्याचे काम सुरु असून धुके आणि पावसामुळे कामात अडथळे येत आहेत. या अपघातामध्ये एक ट्रक चालक जखमी झाला आहे.

कल्याण-अहमदनगर महामार्गावर जवळपास १० किलोमीटर अंतरात माळशेज घाट आहे. या घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळली असून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पुर्णतः थांबवण्यात आली. महामार्ग अधिकारी कर्मचारी तसेच महसूल कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पाऊस आणि धुके यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

ही दरड कोसळली तेव्हा घाटातून जाणाऱ्या एका ट्रकवर त्याचा काही भाग पडल्याने या ट्रकचा चालक अमोल दहिफळे हा जखमी झाला. अमोलला उपचारासाठी आळेफाटा येतील माऊल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button