breaking-newsपुणे

पुणे शहरातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश

पुणे : पुणे शहरातील मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. हे प्रमाण आता 5.1 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांवर आले आहे. पुण्यात सुरुवातीच्या काळात ससून रुग्णालयात कोरोना बळींचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र ते प्रमाण आता कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांच्या वयोगटात पाहायला मिळत आहे. त्यामुळे कन्टेंमेंट झोनमध्ये वयोवृद्ध व्यक्तींचे पालिकेच्या वतीनं सर्वेक्षण करुन मृत्यूदर रोखण्यातही बराच फरक पडला आहे. मृत्यूदर जून महिन्यात 5.1 टक्कयांवर होता तो आता 3 टक्क्यांवर आला आहे.

नुकतेच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोना रुग्ण आणि मृत्यू दर कमी करण्यासाठी एक बैठक घेतली होती. यावेळी या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मृत्यूदर कमी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यासोबत नियोजन आखले होते.

मृत्यूदर आणखी कमी करण्यासाठी पुणे प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून 10 दिवसांचा लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. 13 ते 23 जुलपर्यंत लॉकडाऊन असेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button