breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: मिरजेत दाखल चौघा रुग्णांची प्रकृती चिंताजनक

मिरजेच्या करोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक झाली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. सध्या रुग्णालयामध्ये करोनाबाधित ३६ रुग्ण उपचार घेत असून ४७ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमवारी रात्री जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार चार करोनाबाधितांची स्थिती चिंताजनक असून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात तज्ज्ञ गुंतले आहेत. अत्यवस्थ रुग्णांमध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील ४८ वर्षांचा पुरुष , मोहरे (ता. शिराळा) येथील ५० वर्षांचा पुरुष,  खिरवडे (ता. शिराळा) येथील ५६ वर्षांचा पुरुष व धारावीहून मालगाव (ता. मिरज) येथे बसने आलेल्यामधील ७५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण अतिदक्षता विभागात विशेष उपचाराखाली आहेत. तसेच दि. १९ मे रोजी मुंबईहून आलेली ८७ वर्षीय महिला अतिदक्षता विभागात दाखल असून तिचा करोना चाचणी  अहवाल नकारात्मक आलेला आहे .

जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपर्यंत तीन रुग्ण  करोनाबाधित झाले असून यामध्ये झोळंबी (आष्टा, ता. वाळवा) येथील दिनांक २३ मे रोजी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची  पत्नी (वय २५ वर्ष) करोनाबाधित झाली आहे. तर कामत (खरसुंडीजवळ ता. आटपाडी) येथील ६५वर्ष वयाचा पुरुष रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही व्यक्ती  २३ मे रोजी मुंबईहून आली होती. तसेच कुंडलवाडी (ता. वाळवा) येथील संस्थात्मक अलगीकरणात असलेला व दिनांक १५ मे रोजी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचे वडील (वय ५७) करोनाबाधित झाले आहेत . जिल्ह्यात सद्य:स्थितीत उपचाराखाली ३६ रुग्ण असून आजअखेर ४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत . तर आज अखेर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत ८५ रुग्णांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button