breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, या पक्षात केला प्रवेश

लखनऊ – मालेगाव बॉम्बस्फोटातील गुन्हेगार रमेश उपाध्याय यांनी उत्तर प्रवेशची निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जदयू) पक्षात प्रवेश केला आहे. जदयूचे अध्यक्ष अनूप सिंह पटेल यांनी 12 ऑक्टोबरला उपाध्याय यांना नियुक्ती पत्र दिले. जदयूने त्यांना उत्तर प्रदेशात माजी सैनिक सेलच्या राज्य संयोजकपदी नियुक्त केले असून लवकरच उत्तर प्रदेशच्या दोऱ्यावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रमेश उपाध्याय हे भारतीय सैन्यातील निवृत्त मेजर आहेत. 2008 साली मालेगावातील बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर तसेच लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासोबत रमेश उपाध्याय यांना अटक केली होती. 2017 मध्ये त्यांना जामीन मिळाला असून ते सध्या पुण्यात आहेत.

पक्षप्रवेशाबद्दल रमेश उपाध्याय म्हणाले, “उत्तर प्रदेशातील जदयूच्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी जदयूसाठी काम करण्याचे ठरवले आहे. सध्यातरी निवडणूक लढण्याचा माझा कोणताही विचार नाही. पण, पक्षाच्या कामासाठी लवकरच उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहे. मला जदयूचे नेतृत्व तसेच सामाजिक न्यायासोबतच विकासासाची संकल्पना आवडते.”

तसेच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपांबद्दल विचारले असता, मी निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले. मी एक राष्ट्रवादी आणि सच्चा देशभक्त असून, मालेगाव प्रकरणात मला चुकीच्या पद्धतीनं गोवल्याचंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button