breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात FIR, न्यायालयाचे आदेश

मुंबई – अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणींत वाढ होत आहे. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

याप्रकरणी आता वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर दाखल करण्याचा निर्णय दिला आहे. कंगनाविरोधात भादवी कलम 153(A), 295(A), 124, 34 IPC अंतर्गत FIR दाखल केली जाणार आहे. याप्रकरणी अभिनेत्रीची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button